Crime news : इंस्टाग्रामवरून वृद्ध महिलेला १.८ कोटींचा गंडा; तिरुपतीला प्लॉट घेण्याचे दाखवले अमिष | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Instagram

Crime news : इंस्टाग्रामवरून वृद्ध महिलेला 1.80 कोटींचा गंडा; तिरुपतीला प्लॉट घेण्याचे दाखवले अमिष

नवी दिल्ली- सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. व्हाट्स ऍप, इन्स्टाग्राम यासारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असताना फसवणूक तर होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा लाखोंचा चुना लागण्याची शक्यता असते. अशीच एक घटना समोर आली आहे.

सविस्तर माहिती अशी की, गोरेगाव येथील ६३ वर्षीय महिलेशी नायजेरियन व्यक्तीने इन्स्टाग्रामवर मैत्री करून तब्बल 1.80 कोटी रुपयांची फसवणूक केली. हे प्रकरण सायबर शाखेकडे असून ACP वरुण दहिया यांनी याप्रकरणी दिल्ली येथील निहाल विहार येथून ऐबुका फेलेक्सी आणि चुवाका इवरी यांना अटक केली.

२२ डिसेंबर २०२२ रोजी एक 63 वर्षीय महिलेला ऐबुका फेलेक्सी फ्रेंड रिक्सवेस्ट आली होती. ज्याने स्वतःला पायलट असल्याचं सांगितलं होतं. इन्स्टावर बोलण्यात अडथळा येतो म्हणून तिला नंबर मागण्यात आला.

काही दिवसानंतर आरोपीने महिलेला गिफ्टचे अमिष दाखवले. यासाठी कंपनीचा संदर्भात कॉल येईल. त्यासाठी ३५००० रुपये पाठविण्यास सांगितलं. त्याप्रमाणे महिलेने प्रोसेस पूर्ण केली. पण वेगवेगळ्या नंबर वरुन महिलेला कॉल करून पैसे मागण्यात आले. तसेच तिरुपती येथे प्लॉटचे अमिष महिलेला दाखवण्यात आले. तसेच विकल्यानंतर महिलेला पैसे मिळतील असे सांगण्यात आले. दरम्यान महिलच्या मुलाने याबाबत माहिती घेतल्यानंतर हा फ्रॉड असल्याचं निदर्शनास आलं.

सायबर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून कलम ४२०(फसवणूक) ४२१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणा आणखी एक आरोपी असल्याचं समोर आलं आहे. ज्याच नाव चुवाका इवरी आहे. त्याच्याविरोधात आधीच बऱ्याच गुह्यांची नोंद आहे. या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १६ बँकपासबुक, ७ सीम आणि बऱ्याच गोष्टी जप्त करण्यात आल्या.

टॅग्स :Crime Newsinstagram