Election Results: मोदी, शहा, राहुल गांधी नाही; तर 'या' नेत्याला देशातून सर्वाधिक मताधिक्य

Election Results: मोदी, शहा, राहुल गांधी नाही; तर 'या' नेत्याला देशातून सर्वाधिक मताधिक्य

लोकसभा निकाल 2019
नवी दिल्ली : महागठबंधनपासून राफेलच्या कथित वादग्रस्त करारापर्यंत सर्व मार्ग चोखाळूनही विरोधकांना नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखता आलेला नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपप्रणित एनडीएचे उमेदवार तब्बल्‌ 348 उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसप्रणित यूपीएच्या उमेदवारांना केवळ 81जागांवरच समाधान मानावे लागले. यामुळे देशात पुन्हा एकदा मोदींचीच सत्ता येणार आहे.

या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यावर देशातून सर्वाधिक मताधिक्य भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना मिळाले नाही तर ते भाजपच्याच सी. आर. पाटील सर्वाधिक यांना मिळाले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम भाजपचे खासदार सी. आर. पाटील यांनी केला आहे. गुजरातच्या नवसारी मतदारसंघात त्यांनी तब्बल 6.89 लाख मतांनी काँग्रेसचे धर्मेशभाई पटेल यांचा पाटील यांनी पराभव केला.

सी. आर पाटील यांना पडलेली एकूण मते 969430 एवढी आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी धर्मेशभाई पटेल यांना 281663 एवढी मते पडली आहेत. तर या मतदारसंघात बहुजन समाज पक्षाच्या विणा सिंह यांना 9331 एवढी तिसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत. या मतदारसंघात नोटालाही तब्बल 8878 एवढी मते पडली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com