सीए फायनलचा निकाल लवकरच येणार; 'इथे' पहा रिझल्ट 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019


 सीए फायनल परीक्षा आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकाल बघा सगळ्यात आधी 

नवी दिल्ली :  आज सीए फायनल परीक्षा आणि फाऊंडेशन परीक्षेचा निकाल (ICAI Result 2019) संध्याकाळी जाहीर होणार आहे. सीए फायनल आणि फाऊंडेशनची परीक्षा मे आणि जून २०१९ मध्ये पार पडली होती. विद्यार्थ्यांना ICAI Results च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल बघता येणार आहे. निकाल icai.nic.in या संकेतस्थळावर बघायला मिळेल. तसेच   icaiexam.icai.org आणि caresults.icai.org यावर जाऊन देखील निकाल बघू शकणार आहेत. 

कसा बघाल निकाल?

विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर संकेतस्थळावर (वेबसाईट) टाकावा लागेल. caresults.icai.org या वेबसाईटवर पुढीलप्रमाणे दिलेला क्रम फॉलो केल्यास निकाल बघायला मिळेल. वेबसाईटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर तिथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर निकाल आपल्या स्क्रीनवर दिसेल. तिथे 'प्रिंट'साठी देखील पर्याय उपलब्ध असेल. 

 एसएमएसच्या माध्यमातून निकाल 

फायनल परीक्षा (ओल्ड कोर्स)
CAFNLOLD स्पेस रोल नंबर लिहून 58888 पाठवून द्या.

फायनल परीक्षा (न्यू कोर्स)
CAFNLNEW स्पेस रोल नंबर लिहून 58888 पाठवून द्या.

फाउंडेशन परीक्षा
CAFND स्पेस रोल नंबर लिहून 58888 पाठवून द्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CA Final Foundation Result Expected Shortly Know How to Check

टॅग्स