BJP Government : मार्चपर्यंत CAA चा अंतिम मसुदा तयार होणार; केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगितलं

बीजेपी सरकार: मार्चपर्यंत CAA चा अंतिम मसुदा तयार होणार; केंद्रीय मंत्र्याने स्पष्टता सांगितली
Narendra modi and Amit Shah
Narendra modi and Amit ShahEsakal

नवी दिल्लीः CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा कायदा लवकरच येण्याची शक्यता आहे. सरकारकडून यासंदर्भात कुठलीही घोषणा झालेली नसली तरी ३० मार्चपर्यंत मसुदा तयार होऊ शकतो. ३१ डिसेंबर २०१४च्या पूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांमधून भारतात आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारशी आणि इसाई धर्मियांना नागरिकत्व देण्याविषयी याच्यात तरदूत असल्याचं सांगितलं जात आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी, लवकरच सीएएचा अंतिम मसुदा तयार होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी रविवारी सांगितलं की, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा अंतिम मसुदा पुढच्या वर्षी ३० मार्चपर्यंत तयार होण्याची आशा आहे. उत्तर प्रदेशातल्या एका सभेत त्यांनी याबाबत माहिती दिली.

Narendra modi and Amit Shah
Gold Rate Today: विवाहाचे बजेट बिघडले; सोन्या-चांदीच्या भावात वाढ, काय आहे आजचा भाव?

मिश्रा पुढे बोलले की, मागच्या काही वर्षांपासून सीएए लागू करण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. काही किचकट मुद्द्यांचा अभ्यास केला जात आहे. मतुआ समाजाच्या लोकांचा नागरिकत्वाचा अधिकार कुणीही काढून घेऊ शकत नाही. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत सीएएचा अंतिम मसुदा तयार होणार आहे. भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री शांतनु ठाकूर यांनी मिश्रांचं समर्थन केलं आहे.

Narendra modi and Amit Shah
Telangana Election : तेलंगणमध्ये मोदींच्या आज दोन सभा; तिरुपती बालाजी मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

अजय मिश्रा यांच्या दाव्यावर तृणमूल काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभा खासदार शांतनु सेन यांनी म्हटलं की, भाजपला फक्त निवडणुकांमध्ये मतुआ आणि सीएएची आठवण येते. परंतु पश्चिम बंगालमध्ये भाजप कधीच सीएए लागू करु शकणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com