CAA : ‘सीएए’मुळे स्थलांतर होईल; अरविंद केजरीवालांची केंद्र सरकारवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केजरीवाल यांनी हा देश महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.
CAA
CAA Sakal

नवी दिल्ली : ‘‘ शेजारी देशांतील मुस्लिमेतर अल्पसंख्याकांसाठी भारताची दारे उघडली तर कुणी कल्पनाही करणार नाही एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून येथून स्थलांतर होईल,’’ अशी भीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज व्यक्त केली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना केजरीवाल यांनी हा देश महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे. हिंदू शरणार्थींबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे केजरीवाल अडचणीत सापडले असून काही हिंदू संघटनांनी त्यांच्या घरासमोर आज जोरदार निदर्शने केली. या आंदोलनामध्ये महिला आणि मुले देखील सहभागी झाली होती.

डिजिटल पत्रकार परिषदेमध्ये बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, ‘‘ शहा मला भ्रष्टाचारी म्हणतात पण येथे मी महत्त्वाचा नाही तर हा देश महत्त्वाचा आहे. मी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला शहा यांनी उत्तर दिलेले नाही.

ते केवळ माझा अवमान करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी नागरिकत्व सुधारणा कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करणे म्हणजे भाजपचे मतपेढीचे घाणेरडे राजकारण होय. तुम्ही बाहेरच्या गरीब लोकांना येथे आणून वसविणार आणि येथील लोकांच्या हक्काच्या नोकऱ्या आणि घरे त्यांना देणार.

एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना तुम्ही घरे आणि आर्थिक स्रोत हे कोठून उपलब्ध करून देणार आहेत.’’ दिल्लीमध्ये ७२ लाख लोकांकडे रेशनकार्ड आहे आणि आणखी जास्त रेशनकार्ड बनविण्याची परवानगी आम्ही केंद्राकडे मागितली आहे. बाहेरून आलेल्यांसाठी रेशनकार्ड आहे पण दिल्लीकरांना नाही, असा टोलाही केजरीवाल यांनी लगावला.

केजरीवालांविरोधात समन्स

मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ‘ईडी’ने केलेल्या तक्रारीची दखल घेत मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याविरोधात समन्स बजावले होते. याला आक्षेप घेत केजरीवाल यांनी सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

मद्य धोरण गैरव्यवहाराच्या अनुषंगाने चौकशीला हजर राहावे, अशी नोटीस वारंवार बजावूनही केजरीवाल यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात राउज अव्हेन्यू न्यायालयात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांना ‘ईडी’ने आतापर्यंत आठवेळा समन्स बजावले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com