esakal | जीन्सवरील बारकोडमुळे उलघडले हत्येचे रहस्य!
sakal

बोलून बातमी शोधा

जीन्सवरील बारकोडमुळे उलघडले हत्येचे रहस्य!

तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार

आम्हाला कोलकता येथे एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आम्ही शोध सुरु केला होता. ती यापूर्वी मॉडल होती आता इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होती.  

जीन्सवरील बारकोडमुळे उलघडले हत्येचे रहस्य!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

कोलकता : अनेक गुन्हे घडत असतात. आरोपींचा शोध घेणे पोलिसांना अनेकदा कठीण होते. मात्र, पोलिस आरोपीला शोधून काढतातच. असाच एक प्रकार कोलकता येथे घडला. हत्या झाल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. मात्र, जीन्सवरील बारकोडच्या माध्यमातून तरुणीची माहिती मिळाली. याच आधारावर पोलिसांनी आरोपीला अटकही केली.

पुजा सिंग दे या 30 वर्षीय इव्हेंट मॅनेजर तरुणीचे नाव असून, 31 जुलैला तिची हत्या केल्याचे उघड झाले. तिचा मृतदेह कडारायाप्पाणीहल्ली येथे आढळला. धारधार शस्त्राने वार केल्याने तिची ओळख पटविणे पोलिसांना अवघड जात होते. मात्र, पोलिसांना दोन पुरावे मिळाल्याने याच पुराव्याच्या आधारे संबंधित तरुणीची ओळख पटविण्यात यश आले. 

याबाबत पोलिस उपायुक्त एस. भीमाशंकर यांनी सांगितले, की आम्हाला याप्रकरणी दोन पुरावे मिळाले होते. त्या तरुणीने परिधान केलेल्या जीन्सवरील बारकोड आणि घड्याळामुळे आम्हाल थोडी माहिती मिळविण्यात मदत झाली. आम्ही यावरून जीन्स विक्रेत्याकडे गेलो. त्यावरून काही गोष्टी समोर आल्या. त्या आधारे आम्ही या प्रकरणाचा तपास केल्याने आम्ही आरोपीपर्यंत पोहचू शकलो. 

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर अखेर एच. एम. नागेश या आरोपीला अटक केली आहे. तो कॅबचालक असल्याचे समोर आले आहे. 

तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार

आम्हाला कोलकता येथे एक तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार आम्ही शोध सुरु केला होता. ती यापूर्वी मॉडल होती आता इव्हेंट मॅनेजर म्हणून काम करत होती.  

loading image
go to top