CAB : आसाम पेटले; राज्यात कर्फ्यू लागू, इंटरनेटही बंद

वृत्तसेवा
Wednesday, 11 December 2019

  • ईशान्येत आगडोंब
  • त्रिपुरात लष्कर दाखल
  • गुवाहाटीत संचारबंदी
  • दहा जिल्ह्यांत इंटरनेट सेवा खंडित

गुवाहाटी/ आगरताळा : नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयकाच्या विरोधात ईशान्येकडील राज्यांत आगडोंब उसळला असून, हिंसाचार आणि जाळपोळीमुळे आंदोलचा केंद्रबिंदू असलेल्या गुवाहाटीत आज बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली. नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी त्रिपुरात लष्कराला पाचारण करण्यात आले असून, आसाममध्ये सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

समाजकंटकांनी गैरवापर करू नये म्हणून आसामच्या दहा जिल्ह्यांत इंटरनेट सेवा सायंकाळपासून खंडित करण्यात आली. राज्याच्या लखीमपूर, धेमाजी, तिनसुकीया, दिब्रुगड, चराईदेव, शिवसागर, जोरहाट, गोलघाट, कामरूप (महानगर) आणि कामरूप या दहा जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचे आसमाच्या गृह आणि राजकीय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव कुमार संजय कृष्ण यांनी एका अधिसूचनेद्वारे जाहीर केले.

भाजपनेत्यांना मोठा धक्का; महाविकास आघाडी घेणार मोठा निर्णय

संपूर्ण त्रिपुरातील इंटरनेट सेवाही दुपारी दोनपासून खंडित करण्यात आली. सर्व मोबाईल नेटवर्कवरील एसएमएस सेवाही त्रिपुरा सरकारने खंडित केली आहे. त्रिपुराच्या कांचनपूर आणि मनू या भागांत लष्कर दाखल झाले असून, आसामच्या बंगाईगाव आणि दिब्रुगडमध्ये जवानांना सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CAB Internet blackout in parts of Assam

Tags
टॉपिकस
Topic Tags: