CCD च्या प्रमुखपदी मालविका हेगडे?

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

'कॅफे कॉफी डे'चे (CCD) मालक, संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर आता त्यांच्या जागी कंपनीच्या प्रमुखपदी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : 'कॅफे कॉफी डे'चे (CCD) मालक, संस्थापक व्ही. जी. सिद्धार्थ यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर आता त्यांच्या जागी कंपनीच्या प्रमुखपदी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. 

सिद्धार्थ हे सोमवारपासून बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले असून, त्यांचा मृतदेह आढळला. ही माहिती समजल्यानंतर उद्योगक्षेत्रात मोठी खळबळ उडाली. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येनंतर आता मालविका हेगडे यांच्याकडे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद जाण्याची शक्यता आहे. तसेच संचालक मंडळाकडून नितीन बगमाने यांची अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली.  

याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की मालविका या कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. त्यानुसार कार्यकारी मंडळाकडून त्यांना या पदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार पडताळणी केली जात आहे. मात्र, हे सध्या लगेच शक्य नाही. जेव्हा मालविका धक्क्यातून सावरतील तेव्हा याबाबत विचार केला जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cafe Coffee Day Siddhartha Hegdes wife Malavika may take over as CMD