या अभिनेत्रीचे ड्रग्ज देऊन झाले होते लैंगिक शोषण...

som.jpg
som.jpg

न्यूयॉर्क : ही अभिनेत्री कॉलेजमध्ये असताना तिला अत्यंत वाईट अनुभव आला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या अभिनेत्रीनं तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खुलासा केला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर टफ्लिक्स सीरीज Riverdale मध्ये कॅमिला मेंडेस आहे.

जगभरात उठलेल्या Me Too वादळानं सर्वांनाच ढवळून काढलं. एकामागोमाग एक अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचारांबाबत उघडपणे बोलायला सुरुवात केली. त्यातूनच कॅमिलाने हा अनुभव शेअर केला आहे.

अभिनेत्री कॅमिला मेंडेसनं एका दिलेल्या मुलाखतीत स्वतःवर झालेल्या अत्याचारांबाबत बोलतानाच इतर अनेक खुलासेही केले. कॅमिला सांगते, मी न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीमध्ये Tisch School of the Arts चं शिक्षण घेत होते. त्यावेळी कॉलेजच्या सुरुवातीच्या दिवसांत माझं शारिरिक शोषण करण्यात आलं होतं.

कॅमिला म्हणते, 'कॉलेजचं पहिलं वर्ष माझ्यासाठी खूपच कठीण गेलं. मला त्या वर्षात बरेच वाईट अनुभव आले. एका व्यक्तीनं ड्रग्स देऊन माझं शारीरिक शोषण केलं होतं.' मात्र त्या व्यक्तीचं नाव घेणं मात्र कॅमिलानं टाळलं. ती पुढे म्हणाली, त्यावेळी मी ठरवलं की माझं आयुष्य सुरक्षित आणि सुसह्य करण्यासाठी मला होतील तेवढे प्रयत्न मी करणार. 

ती पुढे म्हणाली, मी एक अशी टीनएजर होते जिच्याकडे बॉडी आणि सकारात्मकतेसाठी कोणीही रोल मॉडेल नव्हतं. त्यावेळी या अशाप्रकारच्या घटनांवर कोणीही उघडपणे बोलत नसे. तसेच त्यावेळी स्लिम असणं हे सुंदरतेच लक्षण मानलं जात असे. तुम्ही कसे दिसता यापेक्षी चांगली हेल्थ असणं खूप गरजेचं आहे. आपण अशा गोष्टी कराव्या ज्या आपल्यासाठी योग्य आहेत. आपल्या शरीरासाठी योग्य आहेत. तसेच आपला आत्मा आणि मेंदूसाठी योग्य आहेत.

 दरम्यान या  घटनेनंतर कॅमिलानं स्वतःच्या पाठीवर 'to build a home' असा टॅटूच बनवून घेतला. 
कॅमिला सांगते, 'हा टॅटू मला आठवण करुन देतो की, स्वतःसोबतच मला माझ्या आसपासच्या लोकांनाही आणि विशेषतः मुलींना खंबीर बनवायचं आहे. मी माझ्या चाहत्यांसाठी आदर्श व्यक्ती होऊ इच्छिते. मला खाण्याच्या सवयींमुळे होणाऱ्या आजारांबाबत जागरुकता पसरवायची आहे. कारण हे कॉलेजच्या वयात खूप गरजेच असतं असं मला वाटतं'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com