Droupadi Murmu : राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येऊ शकते का? मुर्मू यांची न्यायालयाला विचारणा
SupremeCourt : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रपती आणि राज्यपालांना निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा घालता येऊ शकते का, असा प्रश्न विचारला आहे. या संदर्भात त्यांनी १४ महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
नवी दिल्ली : राज्य सरकारांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर राष्ट्रपती आणि राज्यपालांनी निश्चित वेळेत निर्णय घ्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या प्रकरणात अलीकडेच दिला होता.