एखादा जेम्स बॉण्डच या फोटोतील कोणता झेब्रा पुढे आणि कोणता मागे ? आहे हे सांगू शकतो. 

प्राजक्ता निपसे
Saturday, 18 July 2020

संपूर्ण जग उत्तर शोधतंय म्हणून या फोटोवर एक हजारहून अधिक कमेंट आल्यात.

असं म्हणतात कि अनेक गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे तो महत्वाचा असतो . म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळाच अर्थ निघू शकतो. दिसत तस नसत असं म्हणायची वेळ आली आहे. कारण सध्या इंटरनेटवर अशाच एका फोटोची चर्चा आहे. तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना द्यायची असेल किंवा काहीतरी इंटरेस्टिंग ऑनलाइन चॅलेंज वगैरे स्वीकारायचं असेल तर ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच स्मृती भ्रमाशीसंदर्भातील चॅलेंज हा उत्तम पर्याय आहे. सध्या नेटकरी अशाच एका चॅलेंजमध्ये अडकल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे.  

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रविण कासवान यांनी ट्विटवर दोन झेब्रा समोरासमोर उभे असल्याचा एक फोटो शेअर करून नेटकऱ्यांना चॅलेंज दिलं आहे. “चला या दोघांपैकी कोणता झेब्रा पुढे आहे हे कोण सांगू शकतं, ते पाहुयात. हा फोटो सरोश लोधी यांनी क्लिक केला असून त्यानेच मला यासंदर्भातील प्रश्न विचारला आहे,” अशी कॅप्शन दिली आहे. तुम्हीच पाहा हा फोटो आणि सांगा कोणता झेब्रा पुढे कोणता मागे..

अर्थात आता असं चॅलेंज आल्यावर या पोस्टवर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या. कोणी खरोखरच अंदाज व्यक्त केला तर कोणी डोकं गरगरायला लागल्याचं सांगत हे आम्हाला सांगणं अशक्य आहे असही सांगितलं. 

1 उजवा

2 शंभर टक्के डावा

काहीजणांनी तर आपल्या उत्तराचे स्पष्टीकरणसुद्धा दिलं. काय ते पहा 

1 सावली पाहून वाटत आहे की डावा 

2 कान पाहिल्यावर असं दिसत आहे की…

3 सावली पाहता

काही तर चक्रावून गेले कारण झेब्रा पाहून पाहून त्यांचे डोळे दुखू लागले.

1 डावा आणि उजवा पण कोणाचा?

2 काहींना तर हा फोटो एडिट केलेला वाटला.

हेही वाचा :  मोबाईल सॅनिटायझर करण्यासाठी काही योग्य पद्धत जाणून घ्या.  

हा फोटो  कसा कॅप्चर केला.?

वाइल्ड लाइफ फोटो ग्राफर असणारे सरोश लोधी यांनी हा फोटो क्लिक केला आहे. “आफ्रिकेमधील मसाई मारा येथील जंगलांमध्ये झेब्रांच्या एका कळपाचे काही फोटो ते  काढत होते . अनेक झ्रेबा असल्याने  त्यांचे वेगवेगळ्या शैलीतील फोटो काढण्याचा प्रयत्न करत होतो. त्याचवेळी दोन झेब्रा एकमेकांकडे समोरासमोर चालत येताना दिसले. या दोघांमध्ये आता काहीतरी संवाद होईल असं वाटून मी फोटो क्लिक करत राहिलो त्याचवेळी हा फोटो मी क्लिक केला. हे झेब्रा ज्या पद्धतीने उभे आहेत त्यामुळे हे इल्युजन तयार झालं आहे,” असंही  लोधी या फोटोबद्दल सांगितले .

तुम्हाला उत्तर सापडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा कि कोणता झेब्रा पुढे आहे .

संपादन - सुस्मिता वडतिले  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can You Tell Which Zebra Is In Left Or Right