
टोरोंटो : कॅनडामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पक्षाने विजय मिळविला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्याच्या केलेल्या प्रयत्नांनंतर कार्नी यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी भूमिकेला जनतेने भरभरून प्रतिसाद दिल्यानेच लिबरल पक्षाला हे यश मिळाल्याचे विश्र्लेषकांनी सांगितले.