Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणाचंही घर पाडता येणार नाही असं झारखंडच्या उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
cannot demolish house without legal process jharkhand high court on bulldozer action
cannot demolish house without legal process jharkhand high court on bulldozer actionEsakal

कायदेशीर प्रक्रियेशिवाय कोणाचंही घर पाडता येणार नाही असं झारखंडच्या उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सोमवारी झारखंड उच्च न्यायालयात गढवाच्या सीईओने अशोक कुमार यांना बजावलेल्या नोटीसबाबत सुनावणी झाली. यावेळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीचे घर पाडता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

सीईओने अर्जदाराला २४ तासांच्या आत त्याच्या घराची सर्व कागदपत्रे दाखवण्यास सांगितले होते. तसे न केल्यास अतिक्रमण समजले जाईल, असेही सांगण्यात आले होते.

या प्रकरणी गढवा येथील अशोक कुमार यांनी याचिका दाखल केली होती, त्यावर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयने म्हटले की, घरांचे बांधकाम बेकायदेशीर आहे आणि तेथे अतिक्रमण झाले आहे, असे सरकारला वाटत असेल, तर कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच कारवाई करता येईल. यासह न्यायालयाने याचिकेवर कार्यवाही केली आहे.

cannot demolish house without legal process jharkhand high court on bulldozer action
Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

२४ तासांत सर्व कागदपत्रे मागितली होती

सुनावणीदरम्यान, अर्जदाराच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, 10 मार्च 2024 रोजी गढवाच्या सीईओने त्यांना 24 तासांच्या आत घराची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. कागदपत्रे सादर न केल्यास अतिक्रमण मानले जाईल, असे सांगण्यात आले.

अर्जदाराने 11 मार्च रोजी सर्व कागदपत्रे सीईओकडे सादर केली. यानंतर सर्कल इन्स्पेक्टर आणि गढवा सदर पोलिसांसह निवासस्थानी पोहोचले. घराचे मोजमाप केले आणि लाल डाग लावला. याविरोधात अर्जदाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

cannot demolish house without legal process jharkhand high court on bulldozer action
Labor Day 2024 : ऑफीसमधील छळाला तोंड देणाऱ्या प्रत्येकीला हे कायदे माहिती असायलाच हवेत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com