esakal | पुजारी करतायेत सॅनिटायझर वापरायला विरोध; कारण वाचून व्हाल चकित
sakal

बोलून बातमी शोधा

Cant allow sanitisers in temples has alcohol says Bhopal priest

केंद्र सरकारच्या Unlock:1 धोरणातंर्गत आज(ता. ०७)पासून देशभरातील धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. मात्र, भोपाळमध्ये एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. येथील काही मंदिरामधील पुजाऱ्यांनी मंदिरात सॅनिटायझर वापरण्यास विरोध केला आहे.

पुजारी करतायेत सॅनिटायझर वापरायला विरोध; कारण वाचून व्हाल चकित

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : केंद्र सरकारच्या Unlock:1 धोरणातंर्गत आज(ता. ०७)पासून देशभरातील धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. मात्र, भोपाळमध्ये एक वेगळाच वाद सुरु झाला आहे. येथील काही मंदिरामधील पुजाऱ्यांनी मंदिरात सॅनिटायझर वापरण्यास विरोध केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

देशभरात धार्मिक स्थळे सुरु करताना धार्मिक संस्थांनांना सरकारने काही नियम घालून दिले आहेत. त्यामध्ये स्वच्छता व गर्दी होणार नाही, या गोष्टींची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी सॅनिटायजरचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासोबत गाभाऱ्यातील मुर्तीला स्पर्श न करणे, प्रसाद, नारळ-हार इ. गोष्टी अर्पण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

विरोध करण्याचे कारण काय?
सॅनिटायझरमध्ये दारुचा अंश आहे. दारु प्यायलेल्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मंदिरात सॅनिटायझरही वापरु नये. म्हणून मंदिरात सॅनिटायझर मशिन लावण्याला विरोध आहे, असे माँ वैष्णवधाम नवदुर्गा मंदिराचे पुजारी यांनी सांगितले आहे. त्याऐवजी आम्ही लोकांना हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करु, असे तिवारी यांनी म्हटले. यावरुन, सरकारच्या नियमानुसार वागल्यास भाविकांना आपल्या दैवताचे दर्शन घेता येणार असले तरी काही अडचणी समोर येण्याची दाट शक्यता आहे.

जी सेव्हनवरून चीनचा भारताला इशारा; अमेरिकेचा हा डाव असल्याचे मत

दरम्यान, LocalCricles या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार धार्मिक स्थळे सुरु करण्याची परवानगी दिली असली तरी अजूनही बरेसचे लोक मंदिरात जाण्याच्या मनस्थितीत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी गेल्यास कोरोनाची लागण होण्याचा धोका असल्यामुळे लोक जवळपास ५७ टक्के लोक मंदिरात जायला घाबरत असल्याची माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

loading image
go to top