अमरिंदर सिंग उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार? पक्षही करणार भाजपत विलीन

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यानं अमरिंदर सिंग यांनी पंजाब लोक काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला होता.
captain amrinder singh on congress defeat Five states assembly election
captain amrinder singh on congress defeat Five states assembly electionsakal

नवी दिल्ली : पंजाब लोक काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भाजपकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचं बोललं जात आहे. त्यासाठी त्यांचा पक्ष ते भाजपमध्ये विलीन करणार असल्याचीही चर्चा आहे. एबीपी न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे. (Capt Amarinder Singh may Vice Presidential Candidate his party will also merge with the BJP)

सन २०२२च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागल्यानं अमरिंदर सिंग यांनी 'पंजाब लोक काँग्रेस' हा नवा पक्ष स्थापन करत विधानसभा निवडणूक लढवली होती. कॅप्टन अमरिंदर सिंग ८० वर्षांचे आहेत. या वयाच्या लोकांना भाजपकडून निवडणुकांमध्ये तिकीट दिलं जात नाही. त्यामुळेच त्यांनी नवा पक्ष स्थापन केला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी अमरिंदर सिंग यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत चर्चा झाली होती. यावरुन आता अमरिंदर सिंग यांनी आपला पक्ष भाजपत विलीन केल्यास त्यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारीची ऑफर मिळू शकते.

अमरिंदर सिंग सध्या लंडनमध्ये उपचारांसाठी गेले आहेत, आठवड्याभरानंतर ते भारतात परतणार आहेत. त्यानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी अमरिंदर सिंगने काँग्रेस सोडल्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपत दाखल झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com