esakal | बेरोजगारांना देणार डिझायर कार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
sakal

बोलून बातमी शोधा

बेरोजगारांना देणार डिझायर कार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

स्वयंरोजगार वाढविण्यासाठी हे आश्‍वासन देण्यात आले असून, या गाड्यांवर जास्तीत जास्त अंशदानही दिले जाणार आहे.

बेरोजगारांना देणार डिझायर कार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अमरावती (आंध्र प्रदेश) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न राजकीय पक्षांनी सुरू केले असून, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी त्यात आघाडी मारली आहे. राज्यातील बेरोजगार युवकांना मारुती-सुझुकी कंपनीची "डिझायर' गाडी देण्याचे आश्‍वासन तेलुगू देसमने दिले आहे! म्हणजे नोकरी नसल्यास थेट मोटार मिळेल. 

राज्यातील बेरोजगार ब्राह्मण युवकांना या गाड्या देण्याचा वादा चंद्राबाबू यांनी केला आहे. स्वयंरोजगार वाढविण्यासाठी हे आश्‍वासन देण्यात आले असून, या गाड्यांवर जास्तीत जास्त अंशदानही दिले जाणार आहे. ब्राह्मण कल्याण मंडळातर्फे या गाड्यांचे वितरण केले जाईल. लाभार्थी युवकाला गाडीच्या किमतीच्या फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागेल. ऊर्वरित रक्कम आंध्र प्रदेश ब्राह्मण सहकारी क्रेडिट सोसायटीमार्फत दिली जाईल. या रकमेचे हप्ते सरकार भरेल. या गाड्यांचा व्यावसायिक वापर करून युवकांनी स्वयंरोजगार सुरू करावा, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, 'डिझायर'चे कोणते मॉडेल सरकारर्फे दिले जाणार आहे, याची माहिती मात्र मिळू शकली नाही.

loading image