जैन यांच्याविरुद्धचे प्रकरण बनावट

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा
Arvind kejriwal
Arvind kejriwalSakal

नवी दिल्ली - आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या बचावासाठी पुढे सरसावले आहेत. सत्येंद्र जैन यांच्या प्रकरणाचा आपण स्वतः अभ्यास केला असून हे संपूर्ण प्रकरण पूर्णपणे बनावट आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले.

आम आदमी पार्टी भ्रष्टाचार सहन करत नाही आणि भ्रष्टाचारही करत नाही. आमचे सरकार अत्यंत प्रामाणिक आहे. केवळ राजकारणामुळे जैन यांना लक्ष्य करण्यात आले आहे. आमचा कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पंजाबमध्ये आम्ही आमच्याच मंत्र्याला अटक केली. पण सत्येंद्र जैन यांचे प्रकरण पूर्णपणे बनावट आहे, असे केजरीवाल यांनी जैन यांचा बचाव करताना सांगितले. दरम्यान, सत्येंद्र जैन यांना अटक केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी मंगळवारी ट्वीट केले. त्यात म्हटले की, सत्येंद्र जैन यांना कथित मनी लॉंड्रिग प्रकरणात पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कायद्याचा सातत्याने गैरवापर होत आहे. याचा वापर कायदेशीर शस्त्रापेक्षा राजकीय शस्त्र म्हणून केला जात आहे.

‘हिमाचल’शी जोडला संबंध

दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना केलेल्या अटकेचा संबंध आम आदमी पक्षाने हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीशी जोडला आहे. सध्या हिमाचल प्रदेशचे प्रभारी म्हणून कार्यरत असलेले सत्येंद्र जैन यांच्या आक्रमक प्रचारामुळे भाजप धास्तावले आहे, असे पक्षाचे मत आहे. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. केंद्रातील भाजप सरकारने ''आप''च्या कितीही नेत्यांना तुरुंगात पाठवले तरी ते सर्वसामान्यांच्या बाजूने आवाज उठवायचे थांबवणार नाहीत, असे आव्हान पक्षाने दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com