कंगनाविरुध्द कर्नाटकात गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

स्थानिक न्यायालयाच्या अलीकडील आदेशाच्या आधारे सोमवारी तुमकूर जिल्ह्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

बंगळूर : कर्नाटकमध्ये अभिनेत्री कंगना राणावत हिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी (ता. 13) दिली. 

केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना लक्ष्य केल्याच्या आरोपावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थानिक न्यायालयाच्या अलीकडील आदेशाच्या आधारे सोमवारी तुमकूर जिल्ह्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

तुमकूर न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (जेएमएफसी) न्यायालयाने 9 ऑक्‍टोबर रोजी वकील एल. रमेश नाईक यांच्या तक्रारीवरून पोलिसांना एफआयआर नोंदविण्याचे निर्देश दिले होते. ज्या लोकांनी सीएएबद्दल चुकीची माहिती आणि अफवा पसरविल्यामुळे दंगे घडले तेच लोक आता शेतकरी विधेयकाबद्दल चुकीची माहिती पसरवत असून देशामध्ये दहशत पसरवत आहेत. ते दहशतवादी आहेत असा आरोप करून मी काय बोललो ते तुम्हाला चांगलेच ठाऊक आहे पण, तुम्हाला फक्त चुकीची माहिती पसरवणे आवडते, असे राणावत यांनी ट्‌विट केले होते.

हे पण वाचामाजी सैनिकाने उघड केला कोरोना काळातील रेशन घोटाळा

कंगनाच्या याच ट्विटमुळे तिच्यावर गुन्हा दाखर करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार आज कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case filed against Kangana ranaut in Karnataka