भाजपच्या 'या' खासदाराविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल

वृत्तसेवा
Monday, 23 December 2019

मध्य प्रदेशमधील गुणा मतदारसंघाचे खासदार कृष्णपाल यादव आणि त्यांच्या मुलाविरोधात बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभूत केल्यामुळे कृष्णपाल यादव चर्चेत आले होते.

अशोकनगर : मध्य प्रदेशमधील गुणा मतदारसंघाचे खासदार कृष्णपाल यादव आणि त्यांच्या मुलाविरोधात बनावट कागदपत्रे सादर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना पराभूत केल्यामुळे कृष्णपाल यादव चर्चेत आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कृष्णपाल यादव यांच्याबरोबर त्यांच्या मुलाविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी त्यांनी आपल्या क्रिमिलेअरपेक्षा (8 लाख रुपये प्रतिवर्ष उत्पन्न) कमी सांगितले होते. त्यांनी सादर केलेले कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप आहे. यादव यांच्यावर कलम 420 (फसवणूक), 120 ब (गुन्हेगारी कट रचणे), 181 (सार्वजनिक सेवेच्या शपथविरूद्ध खोटी विधान) आणि 182 (चुकीची माहिती देणे), या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.

निरोगी आयुष्य जगण्यासाठी 'या' आहेत महत्वाच्या दहा टिप्स 

यावेळी बोलताना पोलिसांनी सांगितले, की यादव यांनी आपल्या मुलाला आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी बनावट दस्तावेज सादर केले होते. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपले उत्पन्ना लाख रुपये सांगितले होते. दोन्ही उत्पन्नामध्ये अंतर असल्यामुळे कॉंग्रेस आमदाराने त्यांची तक्रार केली होती. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार खासदारांच्या मुलाचे प्रमाणपत्रही रद्द करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Case of fraud registered against KPS Yadav, Guna MP who defeated Jyotiraditya Scindia