नवी दिल्ली - पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य कारवाईचे कयास लढविले जात असताना केंद्र सरकारने आज धक्क्कातंत्राचा अवलंब करताना जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. ही गणना मूळ जनगणनेचाच भाग असेल. कमालीच्या पारदर्शक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.