Electoral Bond: भाजपला सर्वाधिक देणगी देणाऱ्या कंपनीवर CBI ची कारवाई, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Electoral Bond: पोलाद मंत्रालयाच्या NMDC आयर्न अँड स्टील प्लांटच्या आठ अधिकाऱ्यांसह मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CBI action against Megha Engineering and Infrastructure Limited Company
CBI action against Megha Engineering and Infrastructure Limited Companyesakal

Electoral Bond: मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी इलेक्टोरल बाँड्सबाबतचर्चेत होती. ही कंपनी इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यामातून राजकीय पक्षांना देणगी देण्यात दोन नंबरवर होती. 2019-20 आणि 2023-24 या आर्थिक वर्षांमध्ये एकूण 966 कोटी रुपयांचे बाँड्स खरेदी केले. इलेक्टोरल बाँड्स खरेदीच्या बाबतीत ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान कंपनीवर सीबीआयने कारवाई केली आहे. 315 कोटी रुपयांच्या एनआयएसपी प्रकल्पात कथित भ्रष्टाचार केल्यामुळे पोलाद मंत्रालय आणि मेघा इंजिनीअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने आज (शनिवार) याबाबत माहिती दिली.

पोलाद मंत्रालयाच्या NMDC आयर्न अँड स्टील प्लांटच्या आठ अधिकाऱ्यांसह मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CBI action against Megha Engineering and Infrastructure Limited Company
Iran-Israel Row: भारताच्या दिशेने येणारे व्यापारी जहाज इराणने पकडले; जहाजावरील १७ भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न

वृत्तानुसार, शनिवारी अधिकाऱ्यांनी सांगितले की जगदलपूर इंटिग्रेटेड स्टील प्लांटशी संबंधित कामांसाठी मेघा इंजिनिअरिंगची 174 कोटी रुपयांची बिले मंजूर करण्यासाठी सुमारे 78 लाख रुपयांची कथित लाच देण्यात आली होती. एफआयआरमध्ये NISP आणि NMDC चे आठ अधिकारी आणि MECON च्या दोन अधिकाऱ्यांची लाच घेतल्याचा आरोप आहे.

या कंपनीने 585 कोटी रुपयांची देणगी भाजपला इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून दिली होती. कंपनीने BRS ला 195 कोटी रुपये, DMK ला 85 कोटी रुपये आणि YSRCP ला 37 कोटी रुपये दान केले. टीडीपीला कंपनीकडून सुमारे 25 कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेसला 17 कोटी रुपये मिळाले.

CBI action against Megha Engineering and Infrastructure Limited Company
Rahul Gandhi: भारतात 22 लोकांकडे देशातील 50 टक्के संपत्ती ; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com