
पदोन्नतीसाठी अधिकाऱ्याच्या नावाच्या शिफारसीकरिता परमजीत हे लाचेची रक्कम घेत होते.
'लाच' घेताना IAS अधिकारी अटकेत; परमजीतच्या घरावर CBI ची धाड
केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (CBI) चंदीगडमधील पंजाब (Punjab) रोडवेजचे संचालक म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ IAS अधिकारी परमजीत सिंह (Paramjit Singh) यांना अटक केलीय. पदोन्नतीसाठी अधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करण्यासाठी दोन लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली परमजीत सिंह यांना अटक करण्यात आलीय, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सीबीआयनं छापा टाकला, तेव्हा पंजाब परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांकडे पदोन्नतीसाठी अधिकाऱ्याच्या नावाच्या शिफारसीकरिता परमजीत हे कथितपणे लाचेची रक्कम घेत होते. केंद्रीय एजन्सीनं मोहाली आणि चंदीगडमधील परमजीत यांच्या जागेवर छापे टाकले, तेथून 30 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
सीबीआयचे प्रवक्ते आर. सी. जोशी म्हणाले, आरोपीनं तक्रारदाराकडून सरव्यवस्थापकपदाच्या बढतीसाठी 5 लाख रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप IAS अधिकारी परमजीत सिंह यांच्यावर आहे. तसेच लाचेच्या रकमेची वाटाघाटी झाल्याचा आरोपही करण्यात आला असून आरोपीनं दोन लाख रुपये स्वीकारण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.
हेही वाचा: ‘डब्लूएचओ’कडून चुकीचा नकाशा प्रसिद्ध
जोशी पुढे म्हणाले, संचालक (सिंह) यांनी तक्रारकर्त्याला लाचेची रक्कम न दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर आणि प्राथमिक पडताळणीनंतर सीबीआयच्या पथकानं छापे टाकले आणि सिंह यांना 2 लाख रुपयांची लाच घेताना पकडले. आज चंदीगड आणि मोहालीतील आरोपीच्या घरांवर छापा टाकण्यात आला आहे.
Web Title: Cbi Arrests Punjab Ias Officer For Taking Bribe 30 Lakh Recovered From Accused House Chandigarh Mohali
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..