.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोलकता : येथील आर.जी. कर रुग्णालयातील निवासी डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी माजी प्राचार्य संदीप घोष यांची आज सलग चौदाव्या दिवशी सीबीआय चौकशी झाली. सीबीआयने आतापर्यंत त्यांची १४० तासांहून अधिक काळ चौकशी केली आहे. याशिवाय घोष यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा असून यासंदर्भातील तथ्य जाणून घेण्यासाठी सीबीआयने दोन वेळेस पॉलिग्राफ चाचणी केली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त सहा जणांची पॉलिग्राफ चाचणी देखील केली आहे.