CBI : उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्तींविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा; सीबीआयची कारवाई

CBI  AND sn shukla
CBI AND sn shukla

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एसएन शुक्ला आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास यंत्रणेच्या वतीने असे सांगण्यात आले की, शुक्ला आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा 2.45 कोटी रुपयांची मालमत्ता कथितरित्या मिळवली आहे.

CBI  AND sn shukla
Sharad Pawar : पवारांच्या बोलण्याचा अर्थ समजणारा जन्मायचा; शपथविधीच्या मुद्दावर BJPनेत्याचं विधान

माजी न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचाराचा हा दुसरा खटला आहे. न्यायमूर्ती एसएन शुक्ला जुलै 2020 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयातून निवृत्त झाले. ४ डिसेंबर २०१९ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश एस. एन. शुक्ला यांच्यासह छत्तीसगड उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आय. एम. कुद्दुसी आणि इतर चौघांविरुद्ध लखनौ येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूने पैसे घेऊन आदेश दिल्याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

CBI  AND sn shukla
Bavnkule on Sharad Pawar : पवारांना भाजपसोबत युती पाहिजे होती पण फडणवीस...; बावनकुळेंचा मोठा दावा

सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत चौकशीत न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला यांनी केलेला भ्रष्टाचारही उघडकीस आला. तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी २०१८ मध्ये महाभियोगाची शिफारस केली होती. परंतु न्यायमूर्ती मिश्रा यांचे उत्तराधिकारी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या कार्यकाळात त्यांच्यावर महाभियोग चालवण्यात आला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com