
आमदार जसवंत सिंह यांच्या तीन घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.
बँक फसवणूक प्रकरण : आम आदमी पार्टीच्या आमदाराच्या घरावर CBI ची धाड
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोनं (CBI) 40 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी आम आदमी पार्टीचे (AAP) पंजाबमधील आमदार (Punjab MLA) जसवंत सिंह (Jaswant Singh) गज्जन माजरा यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय.
ते म्हणाले, अमरगढच्या आमदाराविरुद्ध बँक फसवणूक प्रकरणा संदर्भात त्यांचे वडिलोपार्जित घर असलेल्या संगरूर जिल्ह्यातील मलेर कोटला भागात झडती घेण्यात येत आहे. बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
या छापेमारी मागे 40 कोटी बँक फसवणुकीचा आरोप असल्याची माहिती आता समोर येत आहे. सीबीआयच्या छापेमारीबाबत माहिती समोर आल्यानंतर राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, लोकप्रतिनिधीच्या विरोधात एवढी मोठी कारवाई होत असल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. सीबीआय या प्रकरणी आणखी काय कारवाई करते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सीबीआयनं 40 कोटींच्या बँक फसवणुकीप्रकरणी पंजाबमधून आम आदमी पार्टीच्या अर्थात आपचे आमदार जसवंत सिंह गज्जन माजरा यांच्याशी संबंधित तीन ठिकाणांवर छापा टाकला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी या छापेमारीबाबत माहिती दिलीय.
Web Title: Cbi Raid Aap Mla Jaswant Singh Gajjan Over Rs 40 Crore Bank Fraud Punjab
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..