Child Pornography : देशातील 20 राज्यांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' अंतर्गत मोठी कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CBI

Child Pornography : देशातील 20 राज्यांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' अंतर्गत मोठी कारवाई

Child Sexual Pornography : चाइल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफी प्रकरणी सीबीआयने देशभरात मोठी कारवाई केली असून, या प्रकरणी मिळालेल्या इनपूटनंतर 20 राज्यांमध्ये 56 ठिकाणी छापेमारी केली जात आहे. 'ऑपरेशन मेघदूत ' अंतर्गत ही कारवाई केली जात आहे.

सिंगापूर आणि न्यूझीलंडच्या इंटरपोल युनिटने दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयकडून ही छापेमारी केली जात आहे. सीबीआयचे हे छापे दिल्ली, मुंबई, बंगळुरू, पाटणासह 20 राज्यांमध्ये सुरू आहेत. गेल्या वर्षी देखील ऑपरेशन केले गेले होते ज्याचे नाव ऑपरेशन कार्बन होते.

हेही वाचा: Shivaji Park : ही तर शिंदेंची खेळी; BKC वर शिवतीर्थापेक्षा तोबा गर्दी जमवणार?

या संपूर्ण प्रकरणात अशा अनेक टोळ्या सक्रीय असून, ज्या केवळ चाइल्ड सेक्शुअल पोर्नोग्राफीशी संबंधित सामग्रीचा वापर करण्याबरोबरच मुलांना शारीरिकरित्या ब्लॅकमेल करून त्यांचा वापर करत आहेत. करतात आणि त्यांचा वापर करत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. या टोळ्या गट तयार करून वैयक्तिकरित्या काम करत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालयही चिंतेत

चाइल्ड पोर्नोग्राफी हा देशातील वाढता चिंतेचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर सातत्याने अपलोड होत असलेल्या चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या व्हिडिओवरही सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून, 19 सप्टेंबर 2022 रोजी सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया कंपन्यांना सोशल प्लॅटफॉर्मवरील चाईल्ड पोर्नोग्राफी आणि बलात्काराचे व्हिडिओ अपलोड करण्यापासून रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत याबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने फेसबुक, ट्विटरसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना 6 आठवड्यात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.