सीबीआयकडून देशातील 150 ठिकाणी छापेमारीची कारवाई

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

सीबीआयने भ्रष्टाचाराविरोधी आज मोठी कारवाई केली. या मोहिमेंतर्गत देशभरातून 150 जागांवर छापेमारी करत चौकशी केली.

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) भ्रष्टाचाराविरोधात आज (शुक्रवार) मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेंतर्गत सीबीआयने देशभरातून 150 ठिकाणी छापेमारी करत चौकशी केली. भ्रष्टाचाराविरोधी चालविण्यात आलेली ही विशेष मोहिम असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दिल्ली, जयपूर, जोधपूर, गुवाहाटी, श्रीनगर, शिलाँग, चंदीगड, शिमला, चेन्नई, मदुराई, कोलकता, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई या शहरांसह पुणे, गांधीनगर, गोवा, भोपाळ, जबलपूर, नागपूर, पाटणा, रांची, गाझियाबाद, डेहराडून आणि लखनऊमध्ये सीबीआयकडून कारवाई करण्यात आली.  

कारवाईमध्ये रेल्वे, वैद्यकीय, आरोग्य, सीमा शुल्क विभाग, फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया, 'एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया' या विभागांसह 150 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBI sudden raids at 150 places around the country