
नवी दिल्लीः देशभर डिजिटल अरेस्टचा आर्थिक गैरव्यवहार घडवून आणणाऱ्या एका मोठ्या सिंडीकेटविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मंगळवारी थेट कारवाई करत चौघा जणांना अटक केली आहे. याच अनुषंगाने देशभरातील तब्बल बारा विविध ठिकाणांवर छापे घालण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या धडक मोहिमेमला ‘ऑपरेशन चक्र-व्ही’ असे नाव देण्यात आले होते.