महाराष्ट्राची 'लेडी सिंघम' मेहुल चोक्सीला आणणार भारतात!

चोक्सीने नोव्हेंबर २०१७मध्ये अँटीग्वाचे नागरिकत्व घेतले होते. तसेच त्याने आतापर्यंत भारताचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यामुळे तो अजूनही भारतीय नागरिक आहे.
IPS Sharda Raut
IPS Sharda RautFile photo
Summary

चोक्सीने नोव्हेंबर २०१७मध्ये अँटीग्वाचे नागरिकत्व घेतले होते. तसेच त्याने आतापर्यंत भारताचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यामुळे तो अजूनही भारतीय नागरिक आहे.

नवी दिल्ली : हजारो कोटींचा घोटाळा करून परदेशात धूम ठोकलेल्या मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण करण्यासाठी भारत हरप्रकारे प्रयत्न करत आहे. चोक्सी प्रकरणी डोमिनिकाच्या कोर्टात आज सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर जर चोक्सीला भारताच्या ताब्यात दिलं, तर चोक्सीला भारतात आणण्याची जबाबदारी सीबीआय ऑफिसर शारदा राऊत यांच्यावर असणार आहे. शारदा राऊत या डोमिनिकामध्ये असलेल्या ६ सदस्यीय सीबीआय टीमच्या प्रमुख आहेत. मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठीच्या महत्त्वाच्या मिशनचे त्या नेतृत्व करत आहेत. (CBI team leader IPS Officer Sharda Raut bring back Mehul Choksi from Dominica)

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, जर आज डोमिनिका कोर्टाने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले, तर त्याला एका खासगी जेट विमानातून नवी दिल्लीला आणण्यात येणार आहे. शारदा राऊत या २००५च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. ईडी आणि सीबीआयचे पथक डोमिनिका कोर्टाला मेहुलच्या कारनाम्यांबाबतची माहिती देतील. डोमिनिकाच्या ताब्यात असलेला मेहुल चोक्सी हा व्यक्ती भारतीय असून त्याचे प्रत्यार्पण कोणत्या आधारावर करणे गरजेचे आहे, ही महत्त्वाची जबाबदारी सीबीआय पथकावर असणार आहे.

IPS Sharda Raut
प्रियांका गांधींनी PM मोदींना करुन दिली 15 ऑगस्टच्या घोषणेची आठवण

डोमिनिकाच्या ताब्यात असलेला चोक्सी हा भारतात जानेवारी २०१८मध्ये मोस्ट वाँटेड आरोपींपैकी एक आहे. तसेच इंटरपोलनेही जारी केलेल्या रेड नोटिस आधारावर त्याला लवकरात लवकर भारताच्या ताब्यात द्यावे, असा पक्षही सीबीआयला मांडावा लागणार आहे. चोक्सीने नोव्हेंबर २०१७मध्ये अँटीग्वाचे नागरिकत्व घेतले होते. तसेच त्याने आतापर्यंत भारताचे नागरिकत्व सोडलेले नाही. त्यामुळे तो अजूनही भारतीय नागरिक आहे.

दरम्यान, मेहुल चोक्सीचा भाऊ चेतन चीनू चोक्सी २९ मे रोजी प्रायवेट जेटने डोमिनिया पोहोचला होता. त्याने स्थानिक विरोधी पक्षनेते लेनोक्स लिंटन यांची भेट घेतली होती. असोसिएट्स टाईम्सचा दावा आहे की, चेतन चोक्सीने डोमिनिकाचे विरोधी पक्षनेते लेनोक्स लिंटन यांना 2 लाख अमेरिकी डॉलरची लाच दिली.

IPS Sharda Raut
नवे IT नियम सर्च इंजिनवर लागू होत नाहीत; गुगलची कोर्टात धाव

चेतनने लेनोक्स यांना आगामी निवडणुकीत मदत करण्याचा विश्वास दिला आहे. बातमीनुसार, चेतनने लिंटन यांना मेहुल चोक्सी प्रकरणी तेथील संसदेत आवाज उठवण्यास सांगितलं आहे आणि मेहुल चोक्सीला पाठिंबा देण्यास सांगितलं आहे. माहितीनुसार चेतन Diminco NV नावाची एक कंपनी चालवतो. ही कंपनी हाँगकाँगची Digico Holdings Limited ची सहयोगी कंपनी आहे. हिरे आणि दागिन्यासंबंधीच्या व्यापारासाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. असे सांगितलं जातं की, लंडनमध्ये नीरव मोदीच्या सुनावणीवेळीही चेतनला कोर्टाबाहेर पाहण्यात आलं होतं.

IPS Sharda Raut
हॉस्पिटलच्या बेडवरुन शशी थरुर यांचा व्हिडिओ; केंद्राला दिला सल्ला

कोण आहेत शारदा राऊत?

पंजाब नॅशनल बँक गैरव्यवहार प्रकरणात तपासप्रमुख म्हणून शारदा राऊत यांनी भूमिका बजावली आहे. पालघरमध्ये पोलिस अधीक्षक असताना त्यांनी गुन्हेगारी जगताला चांगलेच हादरे दिले होते. त्यामुळे त्यांची लेडी सिंघम अशी ओळख बनली होती. मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नंदुरबार आदी ठिकाणी काम करतानाही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यानंतर त्यांची सीबीआयच्या बँकिंग फ्रॉड विभागात नियुक्ती करण्यात आली. मुंबईतील सीबीआयच्या कार्यालयात त्या बँकिंग फ्रॉड विभागप्रमुख म्हणून काम पाहत आहेत.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com