Thur, March 23, 2023

Bihar News : राबडी देवींच्या घरी पोहचली सीबीआयची टीम; 'या' प्रकरणात मोठ्या कारवाईची शक्यता
Published on : 6 March 2023, 6:15 am
जमिनीच्या बदल्यात नोकरीच्या प्रकरणात राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी मोठी कारवाई करत सीबीआयने सोमवारी पटणा येथील राबडी देवी यांच्या घरावर छापा टाकला. यापूर्वी सीबीआयने लालू, राबडी देवी, मिसा भारती यांच्यासह 14 जणांना समन्स पाठवले होते.
सीबीआयने या लोकांना 15 मार्च रोजी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. या 14 वर्ष जुन्या प्रकरणात लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमिनीच्या बदल्यात 7 जणांना रेल्वेत नोकरी दिल्याचा आरोप आहे, त्यापैकी 5 जमीनीची विक्री झाली होती, तर 2 लालूंना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या.