esakal | CBSE पाठोपाठ ICSEने बारावीच्या परीक्षा केल्या रद्द
sakal

बोलून बातमी शोधा

ICSE

विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाची आहे, याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

CBSE पाठोपाठ ICSEने बारावीच्या परीक्षा केल्या रद्द

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ISC 12th Board Exam : नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE)ने बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर आता ‘कौन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन’ (CISCE)ने बारावीची परीक्षा (ISC) रद्द केली. आयसीएसई बोर्डाचे अध्यक्ष डॉ. जी. इमॅन्युअल यांनी ही माहिती दिली. परीक्षा रद्द केल्यानंतर आता गुण देण्याच्या निकषाबाबतचाही निर्णय लवकरच घेण्यात येईल. जर विद्यार्थी निकालावर समाधानी नसतील, तर त्यांना नंतर परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. (CBSE and CISCE cancels Class 12 board exams)

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सीबीएसईने १२ वी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीएसईने यापूर्वी दहावीची परीक्षा रद्द केली आहे. अंतर्गत मूल्यांकनानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा: वयोवृद्धांपेक्षा तरुण महत्त्वाचे; लसीसंदर्भात कोर्टाचा सल्ला

यापूर्वी पंतप्रधान मोदी म्हणाले की, बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून घेण्यात आला आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वेळापत्रकही बिघडले आहे. बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही यामुळे विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांना बर्‍याच ताण-तणावांचा सामना करावा लागला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाची आहे, याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही, असे पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, सीबीएसई आणि आयसीएसई यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षांबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे जाहीर केले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

loading image
go to top