

CBSE Date Sheet
esakal
New Delhi: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. दोन्ही वर्गांच्या परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा ९ मार्चपर्यंत तर बारावीची परीक्षा १ एप्रिलपर्यंत चालणार आहे. सीबीएसईने १०१ दिवस आधीच परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे.