CBSE Result 2023 : CBSE चा दहावीचा निकाल जाहीर! अवघ्या 2 सेकंदात 'असा' पाहा निकाल

CBSE Exam Results 2023: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
CBSE class 10th Result 2023
CBSE class 10th Result 2023 esakal

CBSE class 10th Result 2023 : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थी मागील काही दिवसांंपासून या निकालाची वाट पाहात होते.

दरम्यान विद्यार्थ्यांना https://cbseresults.nic.in/ या लिंकवर क्लिक करून त्यांच्या निकाल पाहाता येणार आहे.

यावर्षी 38 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी साठी CBSE बोर्ड परीक्षा 2023 साठी नोंदणी केली आहे त्यापैकी 21,86,940 विद्यार्थ्यांनी देशभरात 10वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. CBSE ने 5 एप्रिल 2023 रोजी 10वी आणि 12वी साठी CBSE बोर्ड परीक्षा 2023 ही परीक्षा घेण्यात आली होती.

CBSE class 10th Result 2023
SC News : राहुल गांधींना शिक्षा सुनावलेल्या 'त्या' न्यायधीशाचे प्रमोशन स्थगित; सुप्रीम कोर्टाने दिले आदेश

CBSE 10वी बोर्ड परीक्षा 2022 साठी एकूण 21,09,208 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 20,93,978 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. एकूण उपस्थितांपैकी 19,76,668 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.

2022 मध्ये दहावीच्या एकूण 64,908 विद्यार्थ्यांनी 95% आणि त्याहून अधिक गुण मिळवले, तर 2,36,993 विद्यार्थ्यांनी 90% आणि त्याहून अधिक गुण मिळवले.

येथे देखील पाहाता येईल निकाल

10 वीचा निकाल डिजीलॉकर, उमंग अॅप आणि अधिकृत वेबसाइट cbse.gov.in आणि cbseresults.nic.in वर देखील पाहाता येणार आहे. तसेच विद्यार्थी त्यांचा निकाल डाऊनलोड देखील करू शकतात.

CBSE class 10th Result 2023
CBSE 12Th Result: १२ वी निकाल जाहीर; इथे पाहा निकाल एका क्लिकवर

CBSE 10th Result 2023: ऑनलाइन कसा पहाल?

  • cbse.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला किंवा त्यांची वेबसाइट cbseacademic.nic.in ला भेट द्या.

  • लँडिंग पेज / होमपेजवर, CBSE 10वी निकाल 2023 लिंक उघडा.

  • आवश्यक माहितीनुसार आपले लॉगिन तपशील इंटर करा.

  • तुमचा डिटेल्स तपासा आणि डाउनलोड पर्याय निवडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com