

CBSE Makes 3 Languages Mandatory for Class 9
esakal
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शालेय शिक्षणातील भाषा धोरणात मोठा बदल केला आहे. आता २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा नवा नियम १ जुलै २०२६ पासून देशभरातील सर्व सीबीएसई शाळांमध्ये लागू होणार आहे. मात्र, दिलासा देणारी बाब म्हणजे तिसऱ्या भाषेचा दहावीच्या बोर्ड परीक्षेत स्वतंत्र पेपर घेतला जाणार नाही.