School Verification : सीबीएसईने अनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या आणि नियमित उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या शाळेची योग्य पडताळणी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
नवी दिल्ली : नियमित शाळांमध्ये उपस्थित न राहणारे विद्यार्थी बारावीची बोर्ड परीक्षा देऊ शकणार नाहीत, असा इशारा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दिला आहे.