14 Messenger App Banned: मोदी सरकारचा धडाका! हे १४ मेसेंजर अ‍ॅप्प केले बॅन, धक्कादायक कारण उघड

पाकिस्तान कनेक्शन आलं समोर
14 Messenger App Banned:
14 Messenger App Banned:esakal

14 Messenger App Banned: केंद्र सरकारने पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या १४ मेसेंजर अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये Bchat देखील समाविष्ट आहे. इंटेलिजन्स ब्युरोकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय IT मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

भारत सरकारने सांगितले की, या अ‍ॅप्समुळे देशाच्या सुरक्षेला धोका आहे, त्यानंतर त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. याआधी भारताने कारवाई करताना पाकिस्तानमधून चालणाऱ्या अनेक सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घातली होती.

सीमेपलीकडून येणारे हे दहशतवादी पाकिस्तानात बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत बोलण्यासाठी या अ‍ॅप्सचा वापर करत होते. गुप्तचर यंत्रणांच्या माहिती नुसार, या मोबाइल अ‍ॅप्सचा सर्वाधिक वापर जम्मू-काश्मीरमध्येच झाल्याचे आढळून आले आहे.

बंदी घातलेल्या मेसेंजर अ‍ॅप्समध्ये Crypvisor, Enigma, SafeSwiss, Vikerme, Mediafire, Briar, Beechat, Nandbox, Conion, IMO, Elementor, Second Line, Jangi आणि Threema यांचा समावेश आहे.

अलिकडच्या काळात, असे आढळून आले होती की, या ऍप्लिकेशन्सचा वापर पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील ओव्हरग्राउंड कामगार आणि इतर कार्यकर्त्यांना कोडेड संदेश पाठवण्यासाठी केला होता.

देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन्सवर कारवाई ही नवीन गोष्ट नाही, कारण सरकारने यापूर्वी अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

गेल्या काही वर्षांत, भारत सरकारने सार्वभौमत्व आणि अखंडता, संरक्षण, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या सुमारे 250 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

जून 2020 पासून सरकारने 200 हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. यामध्ये TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, Xender, CamScanner, PUBG Mobile आणि Garena Free Fire या लोकप्रिय मोबाईल गेम्सचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com