SC: राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यावरुन केंद्र सरकार काढतंय पळ; कोर्टाने फटकारलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

supreme court on ram setu

SC: राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यावरुन केंद्र सरकार काढतंय पळ; कोर्टाने फटकारलं

नवी दिल्लीः सुप्रीम कोर्टामध्ये आज राम सेतूवरील याचिकेवर सुनावणी झाली. राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करुन त्याला संरक्षण देण्याची मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. कोर्टाने केंद्र सरकारला फटकारत सरकार वेळ मारुन नेत असल्याचं म्हटलं आहे.

Ram Setu Case Hearing In Supreme Court

मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली ३ न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुब्रमण्यम स्वामी यांना सांगितलं की, सरकारने पुन्हा एकदा सुनावणी टाळली आहे. यावर केंद्र सरकारच्या वकिलाने सांगितलं की, यासंबंधी आमचं म्हणणं तयार आहे. परंतु सॉलिसीटर जनरल तुषार मेहता उपस्थित नाहीत. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी केलीय.

Ram Setu Case

हेही वाचाः कोणाचे हिंदुत्व शाश्वत...बापुंचे की संघाचे?

यापकरणी कोर्टाने चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्यास सांगितलं आहे. काँग्रेसच्या यूपीए सरकारमध्ये सुरु केलेल्या सेतू समुद्रम परियोजनेंतर्गत रस्ता बनवण्यासाठी राम सेतू पाडण्यात येणार होता. परंतु कोर्टाने रोखल्यावर ही कार्यवाही थांबली. तेव्हापासून राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याची मागणी होत आहे. चार आठवड्यानंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.