DA: सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राचं गिफ्ट! महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला; सरकारवर पडणार 'एवढा' बोजा

DA News
DA Newsesakal

नवी दिल्लीः मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देत महागाई भत्त्यामध्ये वाढ केली आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के करण्यात आलेला आहे.

केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी केंद्र सरकारने खूशखबरी दिली आहे. केंद्राने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामधअये ४ टक्के वाढ केलीय. डीए आणि डीआरएमध्ये ही वाढ जानेवारी २०२३ पासून लागू होईल.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मोदी सरकारच्या कॅबिनेटने घेतलेल्या या निर्णयानंतर महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरुन ४२ टक्के झाला आहे. पूर्वलक्षी प्रभवाने ही वाढ लागू होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांना याचा लाभ मिळेल.

DA News
Rahul Gandhi : 'त्यांच्याकडे मोठमोठे वकील आहेत, 24 तासांमध्ये अपिल का केलं नाही?' भाजपची पत्रकार परिषद

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सरकारवर १२ हजार ८१५ रुपयांचा बोजा पडणार आहे. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा ४७.५८ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. तर ६९.७६ लाख पेन्शनधारकांनाही या निर्णयामुळे लाभ होईल. डीएमध्ये झालेली ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर करण्यात आलेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com