esakal | CBSE म्हणतेय, आखिर वो दिन आ ही गया! बारावीचा निकाल आज
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ Central Board of Secondary Education (CBSE) आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार आहे.

CBSE म्हणतेय, आखिर वो दिन आ ही गया! बारावीचा निकाल आज

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ Central Board of Secondary Education (CBSE) आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार आहे. विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर दुपारी दोन वाजता आपला निकाल पाहता येणार आहे. सीबीएसई बोर्डाने यासंदर्भातील नोटिस जाहीर केली आहे. (Central Board of Secondary Education CBSE to announce Class XII result today at 2 pm)

CBSE ने आज बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करणार असल्याची घोषणा केली. सीबीएसईने यासाठी एक अधिकृत नोटिफिेकेशन काढलं असून एका मीमच्या सहाय्याने पालक आणि विद्यार्थ्यांना याबाबत कळवलं आहे. नोटिसनुसार, CBSE 12th बीचा निकाल आज दुपारी 2 वाजता cbseresults.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल. निकालामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटणार आहे.

जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बोर्डाच्या बारावीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली होती. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बोर्डाने इतिहासात पहिल्यांदाच पेपर आधारित परीक्षा रद्द करण्याचा आणि त्याऐवजी मागील कामगिरीनुसार त्यांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेतील निकाल आणि कामगिरीच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि पालकांचे या निकालाकडे लक्ष असणार आहे.

loading image
go to top