केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा; वाचा कोणाला कोणता पुरस्कार मिळाला

Padma-Awards-Declare
Padma-Awards-Declare

पर्रीकर, सिंधू ‘पद्मभूषण’चे मानकरी; पोपटराव पवार, राहीबाई पाेपेरे यांना ‘पद्म’
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज सायंकाळी केंद्र सरकारकडून विविध पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस, भाजपचे चाणक्‍य आणि रणनितीकार अरुण जेटली, भाजपच्याच फायब्रॅंड नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मुष्टियोद्धा मेरी कोम हिला ‘पद्मविभूषण’ने सन्मानित केले जाणार आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (मरणोत्तर), बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदींचा ‘पद्मभूषण’ पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक सेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकीय सेवा, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना ‘पद्म’ पुरस्कार जाहीर करण्यात आले. यंदा मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. यंदा १४१ जणांना पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, काहींना संयुक्तपणे हे पुरस्कार देण्यात आले आहेत. सात जणांना पद्मविभूषण, सोळा जणांना पद्मभूषण आणि ११८ जणांना पद्मश्री सन्मान जाहीर झाले. या पुरस्कार विजेत्यांमध्ये ३४ महिलांचाही समावेश आहे. बारा जणांना मरणोत्तर हे पुरस्कार प्रदान केले जातील.

पद्मभूषण

  • एम. मुमताज अली (आध्यात्म- केरळ)
  • सय्यद मुआज्जीम अली (मरणोत्तर) (सामाजिक सेवा-बांगलादेश)
  • मुझफ्फर हुसैन बेग (सामाजिक सेवा-जम्मू आणि काश्‍मीर)
  • अजय चक्रवर्ती (कला- पश्‍चिम बंगाल)
  • मनोज दास (साहित्य आणि शिक्षण-पुद्दुचेरी)
  • बालकृष्ण दोषी (अभियांत्रिकी- गुजरात)
  • कृष्णाम्मल जगन्नाथन (समाजसेवा- तमिळनाडू)
  • एस. सी. जमीर (समाजसेवा- नागालॅंड)
  • अनिल प्रकाश जोशी, (समाजसेवा- उत्तराखंड)
  •  त्सेरिंग लॅंडोल (वैद्यकीय- लडाख)
  • आनंद महिंद्रा (व्यापार आणि उद्योग- महाराष्ट्र)
  • नीळकंठ मेनन (मरणोत्तर) (समाजसेवा- केरळ)   
  • मनोहर पर्रीकर (मरणोत्तर) (समाजसेवा- गोवा)
  • जगदीश सेठ (साहित्य आणि शिक्षण- अमेरिका) 
  • पी. व्ही. सिंधू (क्रीडा-तेलंगण)
  • वेणू श्रीनिवासन (व्यापार आणि उद्योग- तमिळनाडू)

पद्मश्री विजेते

  • गुरु शशधर आचार्य (कला- झारखंड)
  • डॉ. योगी एरॉन (वैद्यकीय- उत्तराखंड)
  • जयप्रकाश अगरवाल (व्यापार - दिल्ली)
  • जगदीशलाल अहुजा (सामाजिक कार्य- पंजाब)
  • काझी मासूम अख्तर (साहित्य आणि शिक्षण- पश्‍चिम बंगाल)
  • ग्लोरिया एरिएरा (साहित्य आणि शिक्षण- ब्राझील)
  • खान झहीरखान बख्तियारखान (क्रीडा- महाराष्ट्र)
  • डॉ. पद्मवर्ती बंदोपाध्यात (वैद्यकीय- उत्तर प्रदेश)
  • डॉ. सुशोवन बॅनर्जी (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल)
  • डॉ. दिगंबर बेहरा (वैद्यकीय- छत्तीसगड)
  • डॉ. दमयंती बेश्रा (साहित्य व शिक्षण- ओडिशा)
  • पोपटराव पवार (सामाजिक कार्य- महाराष्ट्र)
  • अभिराज मिश्रा (साहित्य व शिक्षण- हिमाचल प्रदेश)
  • बिनापनी मोहंती (साहित्य व शिक्षण- ओडिशा)
  • डॉ. अरुणोदय मोंडल (वैद्यकीय- पश्‍चिम बंगाल)
  • डॉ. पृथ्वींद्र मुखर्जी (साहित्य व शिक्षण- फ्रान्स)
  • सत्यनारायण मुंदयूर (सामाजिक कार्य- अरुणाचल प्रदेश)
  •  मणिलाल नाग (कला- पश्‍चिम बंगाल)
  • एन. चंद्रशेखर नायर (साहित्य व शिक्षण- केरळ)
  • डॉ. तेस्तू नाकामुरा (सामाजिक कार्य- अफगाणिस्तान)- मरणोत्तर
  • शिवदत्त निर्मोही (साहित्य व शिक्षण- जम्मू व काश्‍मीर)
  • पु लालबियाकथंगा पाचुआउ (साहित्य व शिक्षण, पत्रकारिता- मिझोराम)
  •  मूळीक्कल पंकजाक्षी (कला- केरळ)
  • प्रसंताकुमार पटनाईक (साहित्य व शिक्षण- अमेरिका)
  • जोगेंद्रनाथ फुकन (साहित्य व शिक्षण- आसाम)
  • राहिबाई सोमा पोपेरे (कृषी- महाराष्ट्र)
  • योगेश प्रवीण (साहित्य व शिक्षण- उत्तर प्रदेश)
  • जीतू राय (क्रीडा- उत्तर प्रदेश)
  • तरुणदीप राय (क्रीडा- उत्तर प्रदेश)
  • एस. रामकृष्णन (सामाजिक कार्य- तमिळनाडू)
  • रानी रामपाल (क्रीडा- हरियाना)
  • कंगणा राणावत (कला- महाराष्ट्र)
  • दलवाई चलपती राव (कला- आंध्र प्रदेश)
  • शाहबुद्दीन राठोड (साहित्य व शिक्षण- गुजरात)
  • कल्याणसिंह रावत (सामाजिक कार्य- उत्तराखंड)
  • चिंताला वेंकट रेड्डी (कृषी- तेलंगण)
  • डॉ. शांती रॉय (वैद्यकीय- बिहार)
  • राधामोहन व साबरमती (संयुक्तपणे) (कृषी- ओडिशा)
  • बटकृष्ण साहू (पशुसंवर्धन- ओडिशा)
  • त्रिनीती साईऊ (कृषी- मेघालय)
  • हिंमतराम भांबू (सामाजिक कार्य- राजस्थान)
  • संजीव भिकचंदानी (व्यापार आणि उद्योग- उत्तर प्रदेश)
  • गफुरभाई एम. बिलाखिया (व्यापार व उद्योग- गुजरात)
  • बॉब ब्लॅकमन (सार्वजनिक व्यवहार- ब्रिटन)
  • इंदिरा पी.पी.बोरा (कला- आसाम)
  • मदनसिंह चौहान (कला-छत्तीसगड)
  • उषा चौमार (सामाजिक कार्य- राजस्थान)
  • लिल बहादूर छेत्री (साहित्य आणि शिक्षण- आसाम)
  • ललिता आणि सरोजा चिदंबरम (संयुक्तपणे) (कला-तमिळनाडू)
  • वज्र चित्रसेना (कला- श्रीलंका)
  • पुरुषोत्तम दधिच (कला- मध्य प्रदेश)
  • उत्सव चरणदास (कला-ओडिशा)
  • इंद्र दासनायके (मरणोत्तर) (साहित्य आणि शिक्षण- श्रीलंका)
  • एच.एम.देसाई (साहित्य आणि शिक्षण- गुजरात)
  • मनोहर देवादोस (कला- तमिळनाडू)
  • ओईनाम बेमबेम देवी (क्रीडा- मणिपूर)
  • लिया डिस्किन (सामाजिक कार्य- ब्राझील)
  • एम.पी.गणेश (क्रीडा-कर्नाटक)
  • डॉ. बंगलोर गंगाधर (वैद्यकीय-कर्नाटक)
  • डॉ. रमन गंगाखेडकर(विज्ञान आणि अभियांत्रिकी-महाराष्ट्र)
  • बॅरी गार्डिनर (सामाजिक व्यवहार- ब्रिटन)
  • चेवांग मोटूप गोबा (उद्योग आणि व्यापार- लडाख)
  • भारत गोयंका (व्यापार आणि उद्योग- कर्नाटक)
  • याडला गोपालराव (कला- आंध्र प्रदेश)
  • मित्रभानू गौनतिया(कला- ओडिशा)
  • तुलसी गौडा(सामाजिक कार्य-कर्नाटक)
  • सुजोय के. गुहा(विज्ञान आणि अभियांत्रिकी-बिहार)
  • हरेकाला हाजब्बा(सामाजिक कार्य-कर्नाटक)
  • इनामुल हक (पुरातत्वशास्त्र- बांगलादेश)
  • मधु मन्सुरी हसमुख (कला-झारखंड)
  • अब्दुल जब्बार (सामाजिक कार्य-मध्य प्रदेश) (मरणोत्तर)
  • विमल कुमार जैन (सामाजिक कार्य- बिहार)
  • मीनाक्षी जैन (साहित्य व शिक्षण- दिल्ली)
  • नेमनाथ जैन (व्यापार व उद्योग- मध्य प्रदेश)
  • शांती जैन (कला- बिहार)
  • सुधीर जैन (विज्ञान व अभियांत्रिकी- गुजरात)
  • बेनिचंद्र जामाठिया (साहित्य व शिक्षण- त्रिपुरा)
  • के.व्ही. संपतकुमार आणि विदुशी जयलक्ष्मी के.एस  (संयुक्तपणे) (साहित्य आणि शिक्षण व पत्रकारीता- कर्नाटक)
  • करण जोहर (कला-महाराष्ट्र)
  • लीला जोशी (वैद्यकशास्त्र- मध्य प्रदेश)
  • सरीता जोशी (कला- महाराष्ट्र)
  • सी. कामलोव्हा (साहित्य व शिक्षण- मिझोरम)
  • डॉ. रवी कन्नन आर. (वैद्यकशास्त्र-आसाम)
  • एकता कपूर (कला-महाराष्ट्र)
  • याझदी नाओशिर्वान करंजिया (कला- गुजरात)
  • नारायण जे. जोशी करयाल (साहित्य व शिक्षण- गुजरात)
  • डॉ. नरिंदरनाथ खन्ना (वैद्यकशास्त्र- उत्तर प्रदेश)
  • नवीन खन्ना (विज्ञान व अभियांत्रिकी- दिल्ली)
  • एस.पी. कोठारी (साहित्य व शिक्षण-अमेरिका)
  • व्ही.के मुनुसामी कृष्णपख्तार (कला- पुद्दुचेरी)
  • एम.के. कुंजोळ (सामाजिक कार्य- केरळ)
  • मनमोहन महापात्रा (कला-ओडिशा)
  • उस्ताद अन्वर खान मंगनियार (कला- राजस्थान)
  • कट्टुंगल सुब्रह्मण्यम मणीलाल (विज्ञान व अभियांत्रीकी- केरळ)
  • मुन्ना मास्टर (कला-राजस्थान)
  • अदनान सामी (संगीत - महाराष्ट्र) 
  • विजय संकेश्वर (व्यापार - कर्नाटक) 
  • डॉ. कुशल कन्वर शर्मा (वैद्यकीय - आसाम) 
  • सईद महंमद शहा कुरेशी ( सामाजिक कार्य - आसाम) 
  • महंमद शरीफ (सामाजिक कार्य - उत्तर प्रदेश) 
  • श्‍यामसुंदर शर्मा ( कला - बिहार) 
  • डॉ. गुरदीप सिंह (वैद्यकीय- गुजरात) 
  • रामजी सिंह ( सामाजिक कार्य - बिहार) 
  • वशिष्ठ नारायण सिंह ( विज्ञान आणि तंत्रज्ञान - बिहार) 
  • दयाप्रकाश सिन्हा (कला - उत्तर प्रदेश) 
  • डॉ. सॅंड्रा देसा सुझा (वैद्यकीय - महाराष्ट्र) 
  • विजयसारथी श्रीभाश्‍यम (साहित्य - तेलंगण) 
  • श्रीमती काली शाबी मेहबूब आणि शेख मेहबूब सुबानी (संयुक्तपणे)(कला - तमिळनाडू) 
  • जावेद अहमद टाक (सामाजिक कार्य - जम्मू-काश्‍मीर) 
  • प्रदीप थलाप्पील (विज्ञान आणि तंत्रज्ञान - तमिळनाडू) 
  • येशी दोर्जी थोंगची (साहित्य - अरुणाचल प्रदेश) 
  • रॉबर्ट ट्रूमन (साहित्य - अमेरिका)
  • अगुस इंद्र उदयाना (सामाजिक कार्य - इंडोनेशिया)
  • हरिशचंद्र वर्मा (विज्ञान आणि तंत्रज्ञान - उत्तर प्रदेश) 
  • सुंदरम वर्मा (सामाजिक कार्य - राजस्थान) 
  • डॉ. रोमेश टेकचंद वाधवानी ( व्यापार - अमेरिका) 
  • सुरेश वाडकर (कला - महाराष्ट्र) 
  • प्रेम वस्ता (व्यापार - कॅनडा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com