केंद्राची सवलत म्हणजे डोंगर पोखरून उंदीर निघाला

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 14 October 2020

‘डोंगर पोखरून उंदीर निघाला’ अशा शब्दांत माजी अर्थमंत्री व कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक सवलत योजनेची संभावना केली. मध्यमवर्गीय आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या  सवलती नगण्य आहेत; परंतु सरकारी प्रचाराचा गाजावाजा करून नुसती अवाढव्य आकडेवारी लोकांच्या तोंडावर टाकल्याची टीकाही त्यांनी केली.

नवी दिल्ली - ‘डोंगर पोखरून उंदीर निघाला’ अशा शब्दांत माजी अर्थमंत्री व कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आर्थिक सवलत योजनेची संभावना केली. मध्यमवर्गीय आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच्या  सवलती नगण्य आहेत; परंतु सरकारी प्रचाराचा गाजावाजा करून नुसती अवाढव्य आकडेवारी लोकांच्या तोंडावर टाकल्याची टीकाही त्यांनी केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ते म्हणाले की, या सवलतींचे प्रमाण लक्षात घेतले तर जीडीपीच्या केवळ ०.१ टक्‍क्‍याहून कमी आहे. एकतर या सवलती केवळ एका विशिष्ट व मर्यादित वर्गापुरत्या मर्यादित आहेत. त्यात अटींची संख्या प्रचंड आहे. सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्याला सरकारच्या अटी पूर्ण करताना दमछाक होणार आहे आणि ३१ मार्च २०२१पूर्वी त्याला ही सर्व पूर्तता करावयाची असल्याने त्याच्यावर लाभापेक्षा बंधनेच अधिक घालण्यात आलेली आहेत. तसेच या सवलतींच्या लाभासाठी त्याला खिशातून दुप्पट खर्च करावा लागेल.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Central Government Discount Issue p chidambaram