
नवी दिल्ली: मतदान केंद्रांवरील सीसीटीव्ही फुटेज उमेदवारांना आणि सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यास आता मज्जाव करण्यात आला आहे. केंद्र सरकारने निवडणूक नियमांमध्ये बदल केल्यानंतर हा निर्णय लागू झाला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता कमी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.