

Gas Crisis India 2026
esakal
नवी दिल्ली, ता. १३ ः ‘‘ देशभरातील सर्वसामान्य ग्राहक आणि व्यावसायिकांनी एलपीजी गॅस सिलिंडरऐवजी सहजपणे उपलब्ध असलेल्या ‘पीएनजी’ गॅसचा वापर करावा, त्यासाठी त्याचे कनेक्शन घ्यावे,’’ असे आवाहन आज केंद्र सरकारकडून करण्यात आले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी सागरी वाहतूक विस्कळीत झाली असल्याने ‘एलपीजी’ गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे.