
पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्याने सरकारी तिजोरीवर येणार इतका 'लोड'!
दिल्ली : आज सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात (excise duty) केली आहे, ज्यामुळे इंधनाच्या किंमती कमी होणार आहेत. तसेच गॅस सिलेंडरवर देखील सबसीडीची देखील घोषणा केली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळेल, मात्र याचा परिणाम सरकारी तिजोरीवर होणार आहे.
सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांनी कपात केली. यानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी होणार आहेत. तसेच केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली. दरम्यान या सवलतीचा सरकारच्या थेट परिणाम हा सरकारी तजोरीवर होणार आहे.
निर्मला सितारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्याने सरकारला मिळणारा सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा वर्षिक महसूल बुडणार आहे. यासोबतच सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या 9 कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलेंडर (12 सिलिंडर पर्यंत) 200 रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा देखील करण्यात आली आहे, यामुळे यामुळे महसूलात वर्षाला सुमारे 6100 कोटी रुपयांच्या तोटा सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा: ग्राहकांना दिलासा! पेट्रोल 9.50 तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त
या दरम्यान निर्मला सितारामन यांनी राज्य सरकारांना विशेषत: ज्या राज्यांमध्ये शेवटच्या फेरीत (नोव्हेंबर 2021) कपात केली गेली नव्हती, त्यांनाही अशीच कपात लागू करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा: पेट्रोल, डिझेल पाठोपाठ घरगुती सिलिंडर 200 रुपयांनी स्वस्त
Web Title: Central Govt Cut Central Excise Duty On Petrol And Diesel Know How Much It Will Cost Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..