Corona Alert: कोविडच्या वाढत्या केसेसमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर; उद्या राज्यांसोबत महत्त्वाची बैठक

Corona Alert: कोविडच्या वाढत्या केसेसमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर; उद्या राज्यांसोबत महत्त्वाची बैठक

नवी दिल्लीः देशामध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे केंद्राची डोकेदुखी वाढली आहे. केंद्र सरकर अलर्ट मोडवर आलेलं असून उद्या केंद्रीय आरोग्य मंत्री राज्य सरकारांसोबत बैठक घेणार आहेत.

देशामध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण वाढत असल्याने केंद्र सरकार सतर्क झालेलं आहे. आज दिल्लीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतरच उद्या (शुक्रवारी) दुपारी १२ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री राज्यांच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

उद्याच्या बैठकीमध्ये सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांचा सहभाग असेल. बैठकीत कोरोनाची परिस्थिती, वाढते रुग्ण, उपाययोजना आणि तयारी; याबाबत चर्चा होणार आहे. देशात एका दिवसामध्ये कोरोनाचे ५ हजार ३३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशामध्ये आतापर्यंत संक्रमित रुग्णसंख्या ४ कोटी ४७ लाख ३९ हजार ५४ इतकी झाली आहे. मागच्या १९५ दिवसांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या वाढलेली आहे.

देशभरात सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २५ हजार ५८७ पर्यंत पोहोचली आहे. देशात मागच्या वर्षी २३ सप्टेंबर रोजी ५ हजार ३८३ केसेस समोर आलेल्या होत्या. आज सकाळी जारी झालेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर पंजाब आणि केरळ राज्यात एक-एक रुग्ण मृत पावला आहे. त्यामुळे देशातील कोरोन मृतांचा आकडा आता ५ लाख ३० हजार ९२९ इतका झाला आहे.

Corona Alert: कोविडच्या वाढत्या केसेसमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर; उद्या राज्यांसोबत महत्त्वाची बैठक
Pankaja-Pritam Munde : मुंडे भगिनी सावरकर गौरव यात्रेला अनुपस्थित; खरं कारण आलं समोर

सध्या देशात २५ हजार ५८७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.७५ टक्के आहे. तर देशातील संक्रमणाचा दैनंदिन दर ३.३२ टक्के असून साप्ताहिक दर २.८९ टक्के आहे. तर मृत्यूदर १.१९ टक्के इतका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com