दिल्ली सरकारकडून माहिती अधिकाराचे उल्लंघन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Central Information Commissioner Uday Mahurkar alleged Kejriwal government violating Right to Information Act Delhi

दिल्ली सरकारकडून माहिती अधिकाराचे उल्लंघन!

नवी दिल्ली : दिल्लीत केजरीवाल सरकार माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आयुक्त उदय माहूरकर यांनी केला. त्यांनी यासंबंधी नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांना पत्र पाठवले आहे. याची दखल घेत सक्सेना यांनी मुख्य सचिवांना कारवाईचे आदेश दिले. दिल्ली सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

माहिती अधिकार अर्जावर सरकारी विभाग आणि संस्था अर्धवट माहिती देत असून अनेक प्रकरणांमध्ये परस्पर संगनमत केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हित जपले जात नसल्याचे आयुक्तांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.