
Government Employee: केंद्र सरकारने नुकतंच आठव्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यावेळी फिटमेंट फॅक्टर २.८६ इतका लागण्याची आशा व्यक्त केली जात आहे. या हिशोबाने कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये १८६ टक्क्यांची भरघोस वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र माजी वित्त सचिव सुभाष गर्ग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अशी वेतनवाढ अशक्य गोष्ट आहे. एका टीव्ही चॅनेलला गर्ग यांनी मुलाखत दिली आहे.