
नवी दिल्ली : केंद्र सरकारने झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या दोन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या दोन्ही प्रकल्पांवर सहा हजार चारशे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये झारखंडमधील १३३ किलोमीटर लांबीचा कोडरमा ते बरकाकाना मार्ग आणि कर्नाटकातील बल्लारी ते चिकजाजूर दरम्यानचा १८५ किलोमीटर लांबीचा अतिरिक्त रेल्वेमार्ग यांचा समावेश आहे.