Oil Price Drop : खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या पाम, सोया आणि सूर्यफूल तेलावरील मूलभूत आयात कर १० टक्क्यांनी कमी केला आहे. या निर्णयामुळे आयात खर्च कमी होणार असून देशांतर्गत किंमतीत घसरण अपेक्षित आहे.
नवी दिल्ली : अन्नधान्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या खाद्यतेलांवरील मूलभूत आयात कर दहा टक्क्यांनी कमी केला आहे. हा बदल ३१ मे पासून लागू होईल, असे केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटले आहे.