Free Ration: 80 कोटी नागरिकांना पंतप्रधान मोदींचे दिवाळी गिफ्ट; 5 वर्षे मोफत शिधा मिळणार

Free Ration
Free Ration
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शनिवारी दिवाळी गिफ्ट दिले. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी पाच वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबियांना पुढील पाच वर्ष मोफत शिधा दिला जाणार आहे. माहितीनुसार, ८० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होत आहे. (Centre modi government free ration scheme extended for next 5 years says PM narendra Modi)

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना मोफत शिधा दिला जातो. कोरोना महामारीच्या काळामध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. कोरोना काळामध्ये आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. देशात लॉकडाऊन लादण्यात आला होता. अशावेळी गरिबांना दिलासा म्हणून त्यांना मोफत शिधा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दाव्यानुसार, या योजनेचा लाभ ८० कोटी नागरिकांना होत आहे.

छत्तीसगडमध्ये मोदींची घोषणा

पंतप्रधान मोदी सध्या छत्तीसगडमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी दुर्गे येथे सभेला संबोधित करताना त्यांनी मोफत शिधा योजना पाच वर्षांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली. छत्तीगडमध्ये या महिन्यात निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या या घोषणेकडे पाहिलं जात आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. येथे दोन टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.

Free Ration
Gold Investment: 1 ग्रॅम सोने खरेदी करा अन् 2.50 टक्के व्याज मिळवा; काय आहे मोदी सरकारची योजना?

डिसेंबरमध्ये कालावधी संपणार होता

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार होता. पण, निवडणुकीच्या तोंडावर कालावधी वाढवण्याचा निर्णय घेऊन राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या योजनेंतर्गत गरिबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळते. केंद्र सरकारने ही योजना ३० जून २०२० मध्ये सुरु केली होती. कालावधी वाढवल्यामुळे आता या योजनेचा डिसेंबर २०२८ पर्यंत लाभ घेता येईल. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com